Sun, Jul 21, 2019 07:48होमपेज › Pune › महामेट्रोच्या वृक्ष पुनर्रोपणाचा मार्ग मोकळा

महामेट्रोच्या वृक्ष पुनर्रोपणाचा मार्ग मोकळा

Published On: Aug 11 2018 1:21AM | Last Updated: Aug 11 2018 12:43AMपुणे : प्रतिनिधी 

शहरात सध्या मेट्रो प्रकल्पाच्या कामाने वेग घेतलेला आहे. वनाज ते रामवाडी (रिच 2) या मेट्रो मार्गामध्ये एकूण 172 वृक्षांचा मेट्रोच्या खांब आणि स्टेशन बांधकामात अडथळा होत आहे. या 172 वृक्षांपैकी वृक्षप्राधिकरणाकडून महाराष्ट्र रेल कॅार्पोरेशन लिमिटेडला (महामेट्रोला) 106 झाडांचे पुनर्रोपण करण्याची परवानगी मिळाली आहे. हे सर्व वृक्ष येत्या काही दिवसात तळजाई येथे पुनर्रोपित करण्यात येणार असल्याची माहिती रिच 2 चे प्रकल्पाधिकारी अतुल गाडगीळ यांनी दिली.

वनाज, आनंद नगर, आयडियल कॅालनी या ठिकाणी मेट्रोच्या स्टेशन आणि मेट्रो मार्गाचे  बांधकाम सुरू आहे. या बांधकामा दरम्यान काही वृक्षांचा अडथळा होत आहे. वृक्ष प्राधिकरणाने पुनरोपीत करण्यासाठी परवानगी दिलेल्या 106 वृक्षांपैकी पौड रस्त्यावरील काही वृक्षांचा समावेश असणार आहे. महामेट्रोने 7 जुलै 2017 मधे वृक्षप्राधिकरणाकडे मेट्रो मार्गात येणार्‍या वृक्षांच्याबाबत प्रस्ताव मांडला होता. मात्र गेल्या काही दिवसात यावरून महापालिका आणि महामेट्रो यांच्या मध्ये प्रस्ताव आणि परवानगी वरून वाद सुरू होता. मेट्रो बांधकामामध्ये वनाज ते रामवाडी या मार्गादरम्यान एकुण 172 वृक्षांच्या अडथळा होत आहे. या पैकी एकही वृक्ष तोडला जाणार नाही, अशी हमी महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिलेली आहे. त्यानुसार वृक्ष पुरर्रोपणाच्या परवानगीची प्रक्रिया सुरू होती. 

पर्यावरणवाद्यांनी राष्ट्रीय हरित न्यायधिकरणात दाखल केलेल्या केसचा निकाल महामेट्रोच्या बाजूने लागला आहे. मात्र कोर्टाने महामेट्रोला काही अटींची पुर्तता करत, काम चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या अटींपैकी मुख्य अट ही वृक्षतोडीसंदर्भातील आहे. नदीपात्रातील अडथळा ठरणार्‍या 32 वृक्षांसह एकुण 96 वृक्षांचे पुनर्रोपण त्याच भागात करणे महामेट्रोला बंधनकारक असणार आहे.

वृक्षाचा एकूण आकार (डीबीएच) गृहित धरून, त्यांच्या आठ पट खोदाई करून मुळाचा भार खोदून मोठ्या क्षमतेच्या क्रेनने ज्या जागेत वृक्ष लावायचे आहेत, त्याठिकाणी लावले जात आहेत. नविन पद्धतीच्या कामाचा खर्च जरी जास्त असला तरी त्यामध्ये काम करताना वृक्षांना अतिशय कमी इजा पोहोचते व झाडे जगण्याचे प्रमाण जुन्या पद्धतीपेक्षा अधिक आहे; असे महामेट्रोकडून सांगण्यात आले.