Mon, Mar 25, 2019 04:54
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › पुणेकरांना उद्यापासून वायफाय सेवा 

पुणेकरांना उद्यापासून वायफाय सेवा 

Published On: Jan 25 2018 4:44PM | Last Updated: Jan 25 2018 4:44PMपुणे : प्रतिनिधी

शहरातील पहिल्या वायफाय सेवेचे उद्घाटन उद्या (शुक्रवार २६ जानेवारी) पालिका भवन येथे होणार आहे. शहरात १५० ठिकाणी वायफाय सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्मार्ट सिटीचे संचालक राजेंद्र जगताप, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

पहिल्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीस सुमारे 50 एमबी इंटरनेट (५१२ केबीपीएस स्पीडने) मोफत वापरता येणार आहे. शहरातील विविध उद्याने, हॉस्पीटल, शाळा महाविद्यालये या ठिकाणी वायफाय सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यावरुद सरकारने बंदी असलेल्या वेबसाईड पाहता येऊ नये म्हणून फिल्टर व्यवस्थाही असणार आहे.

वायफाय सेवा  रेलटेल, एल अँड टी आणि गुगल यांच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध होणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे.