Tue, Jul 16, 2019 00:14होमपेज › Pune › मोफत वायफाय सेवेचा प्रारंभ

मोफत वायफाय सेवेचा प्रारंभ

Published On: Jan 28 2018 1:37AM | Last Updated: Jan 27 2018 11:52PMपुणे : प्रतिनिधी

नागरिकांना इंटरनेटशी जोडून ठेवण्यासाठी, नागरिकांपर्यंत शासकिय सुविधा पोहोचवण्यासाठी आणि महापालिकेसह शासकिय संस्थांकडे करावयाचे अर्ज नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने भरावेत, यासाठी महापालिका आणि स्मार्ट सिटी याच्याकडून सुरु करण्यात आलेल्या मोफत वायफाय सेवेचा प्रारंभ महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. 

महापालिकेत संपन्न झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पालिका आयुक्त कुणाल कुमार आणि स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप उपस्थित होते. केंद्र आणि राज्य शासनाने डिजीटल इंडियाची घोषणा केली आहे. गतीमान व्यवहारांसाठी देशात सर्वच क्षेत्रात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील अधिकाअधिक नागरिकांनी करावा, यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पहिल्या टप्प्यात शुक्रवारी देशरात 150 ठिकाणी मोफत वाय फाय हॉट स्पॉट सुविधा सुरु करण्यात आली.

शहरातील 60 उद्याने, महापालिकेची 46 रुग्णालये, महापालिका भवन, निबंधक कार्यालयासह 7  शासकिय कार्यालये, 3 म्युझीयम, गणेश कला क्रिडा केंद्र, पुणे रेल्वे स्टेशन बस स्थानक, स्वारगेट एस.टी. स्थानक, ब्रेमेन चौक आणि 30 पोलिस ठाण्यांमध्ये वाय फाय सुविधा कार्यन्वीत करण्यात येणार आहे.