Wed, May 22, 2019 20:16होमपेज › Pune › रेल्वे खात्यात नोकरीच्या आमिषाने 95 लाखांचा गंडा

रेल्वे खात्यात नोकरीच्या आमिषाने 95 लाखांचा गंडा

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 15 2018 1:10AMपुणे : प्रतिनिधी 

आपण रेल्वे खात्यात नोकरीस असून, आतापर्यंत अनेकांना नोकरी लावल्याचे सांगत एका महिलेसह दोघांनी खोटी कागदपत्रे तयार करून देत नोकरी न लावता एकाची तब्बल 95 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हरकणी धुर्वे (45, मु. पो. आळंदी, ता. खेड, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फारुख शेख ऊर्फ पटेल (50, भुसावळ, जि. जळगाव), वसिम शेख (25) व एक महिला यांच्यावर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

फारुख  शेख उर्फ पटेल हा मे 2017 मध्ये धुर्वे यांना भेटला. त्याने आपण स्वत: रेल्वे खात्यात मोठ्या पदावर नोकरीस असल्याचे सांगितले. त्यानंतर ते पाच मुलांना रेल्वेत नोकरीस लावू शकतो, असे सांगून कोरेगाव पार्क येथे जर्मन बेकरीमध्ये धुर्वे यांच्या मुलासह नातेवाईकांच्या काही मुलांना बोलावून घेतले. तेथे त्यांच्याकडून रेल्वे भरतीचे फॉर्म भरून घेतले. तसेच त्यांना परीक्षेत उत्तीर्ण करून नोकरी लावतो, असे सांगत वेळोवेळी त्यांच्याकडून एकूण 95 लाख रुपये घेतले. त्यानंतर वेळोवेळी वेगळी कारणे देत तो धुर्वे यांना हुलाकावणी देत राहिला.

फसवणूक झाल्याचे लात येताच धुर्वे यांनी याबाबत न्यायालयात खासगी दावा दाखल केला. त्यात न्यायालयाने फारुख शेख, वासिम शेख व एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  संबंधितांनी आणखीही काही जणांना फसविले असण्याची शक्यता गृहित धरून, त्यांनी आणखी किती जणांचे पैसे घेतले, किती जणांना नोकरी लावण्याचे अमिष दाखवले, याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक ए. आर. रावडे यांनी दिली.

Tags : Pune, Fraud, 95, lakhs,  jobs,  Railway, department, baitc