Wed, Sep 26, 2018 18:28होमपेज › Pune › तोतया पोलिसाकडून फसवणूक

तोतया पोलिसाकडून फसवणूक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रातिनिधी

पोलिस असल्याचे सांगून, अंगावरील  दागिने काढून ठेवत असताना हातचलाखी करून एका वृद्धाचे 26 हजार रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास कल्याणी हॉटेलजवळ, डुडुळगाव येथे घडला.

याप्रकरणी डुडुळगाव येथील 65 वर्षीय इसमाने फिर्याद दिली आहे, तर, अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  पीडित व्यक्ती ही रस्त्याने जात असताना त्या ठिकाणी दोघे जण आले. आम्ही पोलिस आहोत, पुढे तपासणी सुरू असून, तुमच्या जवळील दागिने काढून रुमालात बांधून ठेवा, असे सांगितले. या दोघांच्या बोलण्यावर विश्‍वास बसल्याने सोनसाखळी आणि अंगठी काढून रुमालात बांधत असताना या तोतया पोलिसांनी हातचलाखी करून ते लंपास केले. तपास दिघी पोलिस करीत आहेत.