होमपेज › Pune › ओएलएक्सवरून कार घेणे पडले महागात

ओएलएक्सवरून कार घेणे पडले महागात

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 04 2018 12:57AMपुणे : प्रतिनिधी

ओएलएक्सवरून कार घेणे एका व्यापार्‍याला चांगलेच महागात पडले असून, भामट्यांनी त्याला तबल सव्वादोन लाखांना गंडा घातला आहे.  या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मनोज मुथा (वय 47, रा. बिबवेवाडी) यांनी तक्रार दिली आहे.  

मुथा हे बिबवेवाडी येथील लेक हौसिंग सोसायटीत राहतात. ते तेलाचे व्यापारी आहेत. त्यांना कार घ्यायची होती. त्यामुळे ते ओएलएक्सच्या ऑप्लिकेशनवर कार पाहत होते. त्या वेळी त्यांना मारुती सुझुकी कंपनीची सियाझ मॉडेलच्या कारची जाहिरात दिसली. त्या जाहिरातीवर असेलल्या क्रमांकावर त्यांनी फोन करून कार विकत घ्यायची असल्याचे सांगितले. त्यानुसार कार घ्यायचे ठरले.

लोहगाव एअरपोर्ट कार्गोे येथून कार घेण्यासाठी आरोपींनी मुथा यांना एसबीआयच्या बँक खात्यावर एक लाख 26 हजार रुपये भरायला लावले. त्यानंतर आणखी वेगवेगळी कारणे सांगून महालक्ष्मी बँकेच्या खात्यावर 92 हजार रुपये भरायला लावले. आरोपींनी मुथा यांच्याकडून तब्बल दोन लाख 18 हजार रुपये भरायला लावले. तरीही त्यांना कार मिळाली नाही. त्या वेळी त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर सेलकडे तक्रार दिली.   तपास पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे करत आहेत.