Thu, Apr 25, 2019 13:37होमपेज › Pune › शरीरसंबंधाचे आमिष दाखवून ५४ लाखांचा गंडा

शरीरसंबंधाचे आमिष दाखवून ५४ लाखांचा गंडा

Published On: Sep 06 2018 10:20AM | Last Updated: Sep 06 2018 11:34PMपिंपरी : प्रतिनिधी

महिलेने शरीरसंबंधाचे आमिष दाखवून  तरुणाला तब्बल 54 लाखांना गंडा घातल्याचा धक्‍कादायक प्रकार निगडी येथे उघडकीस आला आहे. बुधवारी (दि. 5) रात्री अकराच्या सुमारास या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

या प्रकरणी जहीर युसूफ शिकलगार (30, रा. यमुनानगर, निगडी) याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून एका अनोळखी महिलेसह तिच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी जहीरच्या मोबाईलवर फोन करून ओळख वाढवली. तिने शरीरसंबंध ठेवायला तयार असल्याचे आमिष दाखवून तसेच वडिलांच्या कॅन्सरचा बहाणा करून जहीरकडून पैसे उकळले. महिलेच्या भूलथापांना बळी पडलेल्या जहीरने महिलेला वेळोवेळी पेटीएम, फोन-पे, मोबी क्विक, एसबीआय व्हॅलेट आणि बँकेच्या खात्यातून आयएमपीएस करून एकूण 53 लाख 65 हजार रुपये हस्तांतरित केले. पैसे मिळाल्यानंतर महिलेचे फोनवर बोलणे कमी केले. जहीरने पैशांची मागणी केल्यानंतर महिलेने पैसे परत न देता त्याची फसवणूक केली. पुढील तपास निगडी पोलिस करीत आहेत.