Thu, Apr 25, 2019 14:03होमपेज › Pune › चार  पिस्तूल,10 काडतुसे जप्त

चार  पिस्तूल,10 काडतुसे जप्त

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 22 2017 12:43AM

बुकमार्क करा

पुणे/ वाघोली : वार्ताहर

दोन सराईत गुन्हेगारांना अटक करून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) शस्त्रसाठा जप्त केला आहे. वाघोली परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल चार गावठी पिस्तूल आणि 10 जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. ते पिस्तूल विक्रीसाठी आल्याचे समोर आले आहे. 

राजेंद्र उर्फ राजा माणिक राठोड (वय 32, रा. वाघोली, हवेली, मूळ रा. बीड) धोंडीभाऊ महादू जाधव (वय 25, रा. निघोज, ता. पारनेर, अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांनी धुमाकूळ  घातला आहे. त्यांना जेरबंद करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. दरम्यान एलसीबीला शिरूर परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगार राजा उर्फ राजेंद्र राठोड व त्याचा साथीदार वाघोलीत पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी बाजारतळ मैदान चौकामध्ये सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, चार गावठी पिस्तूल व दहा जिवंत काडतुसे मिळून आले. राजेंद्र राठोड याचा अहमदनगर जिल्ह्यातील वाळूचा व्यवसाय आहे. त्याने औरंगाबाद (गंगाखेड), पुणे जिल्ह्यामध्ये शिरुर, दौंड येथे वाळूचा व्यवसाय करुन वाळू माफिया व गुन्हेगारांशी संबंध निर्माण केले आहेत. दरम्यान प्रशासनाकडून वाळू माफिंयांवर जोरदार कारवाई सुरू असल्याने राठोड हा वाघोलीत हॉटेल व्यवसाय सुरू करणार असल्याचे समोर आले आहे.