Tue, Nov 13, 2018 06:23होमपेज › Pune › मांडुळ तस्कर प्रकरणी चार जण ताब्यात

मांडुळ तस्कर प्रकरणी चार जण ताब्यात

Published On: May 17 2018 7:33PM | Last Updated: May 17 2018 7:33PMपिंपरी : प्रतिनिधी

अंधश्रध्देच्या समाजात मोठ्या प्रमाणात मागणी असणार्‍या मांडुळ जातीच्या सापाची तस्करी करणार्‍या चौघांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन मांडुळ जप्त करण्यात आली आहेत. वाकड पोलिसांनी आज, (गुरूवार दि. १७ मे) दुपारी हि कारवाई केली.

अमर अरुण राठोड (वय - १९, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड), बाबासाहेब वसंत रोकडे (वय - २१, रा. वाकड), भिमराव नरसप्पा जाधव (वय - २२) आणि सागर चंद्रकांत घुगे (वय - २२, रा. रघुनंदन मंगल कार्यालयाच्या मागे, ताथवडे) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. 

सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, वाकड पोलिस आपल्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी वाकडच्या मुंजोबा देवाच्या मंदिराच्या पाठीमागे मांडुळ विक्रीसाठी तरुण येणार असल्याची माहिती पोलिस नाईक राजेश बारसिंगे आपल्या गोपनीय सूत्राकडून मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथकाचे उपनिरीक्षक हरीष माने, यांच्यासह आदि. पोलिस कर्मचाऱ्यांनी या परिसरात सापळा रचला. यावेळी मुंजोबा देवालयाच्या मागील बाजूस मांडुळ तस्करीसाठी आलेल्या या चौघांना पोलिसांनी अटक केली. तर त्यांच्याकडून मांडुळ जातीचे साप जप्त करण्यात आले.