Tue, Jul 16, 2019 14:01होमपेज › Pune › सलग चार दिवस बँका बंद

सलग चार दिवस बँका बंद

Published On: Apr 26 2018 2:03AM | Last Updated: Apr 26 2018 1:43AMपुणे : प्रतिनिधी 

या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 28 एप्रिल, 29 एप्रिल आणि 30 एप्रिल या सलग तीन दिवशी बँका बंद राहणार आहेत. तसेच 1 मे रोजीही महाराष्ट्र दिन असल्याने बँका बंद असणार आहेत. यामुळे ग्राहकांची ऐन लग्नसराईमध्ये तारांबळ उडण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना याआधीच  26 व 27 एप्रिल रोजी कामे करण्यासाठी बँकेकडे धाव घ्यावी लागणार आहे.

या चार दिवसांत आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी  एटीएमचा पर्याय उपलब्ध असणार आहे.  एटीएमवरच  आर्थिक व्यवहार करावे लागणार आहेत. मात्र, तेथे नोटांची टंचाई होऊ शकते. यानंतर 2 मेपासून पुन्हा बँका पूर्ववत सुरू होणार आहेत. सलग चार दिवस बँका बंद असल्याने नंतर बँका उघडल्यावर बँकेत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.