Sun, Jun 16, 2019 12:11
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › पुणे : इमारतीच्या बाल्कनीतून पडलेल्या 'त्या' बालकाचा मृत्यू

पुणे : इमारतीच्या बाल्कनीतून पडलेल्या 'त्या' बालकाचा मृत्यू 

Published On: Jun 05 2018 4:44PM | Last Updated: Jun 05 2018 4:44PMवाकड : वार्ताहर 
इमारतीच्या बाल्कनीतून पडलेल्या चार वर्षाच्या बालकाचा आज (मंगळवारी) उपचारादरम्यान मृत्यू झाला. ३१ मे रोजी रहाटणी येथे ही घटना घडली होती. दक्ष महेश कदम असे मृत बालकाचे नाव आहे. दक्ष घरात खेळत असताना तो बाल्कनीत गेला. बाल्कनीला सुरक्षेसाठी लोखंडी गज होते. पण गजांच्या फटीतून तो खाली पडला होता.

या अपघातात त्याच्या छातीला आणि डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर थेरगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.