Fri, Jul 19, 2019 22:44होमपेज › Pune › पुणे : अनैतिक संबंध;तरुणाला मारहाण

पुणे : अनैतिक संबंध;तरुणाला मारहाण

Published On: Apr 21 2018 9:56AM | Last Updated: Apr 21 2018 10:03AM पिंपरी : प्रतिनिधी  
अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तरुणाचे अपहरण करुन त्याला मारहाण करत लुबाडल्याची घटना पिंपळे गुरव ते कामशेत दरम्यान घडली आहे. बुधवारी घडलेल्या प्रकारानंतर शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी लक्ष्मण बजरंग मोरकडे (27, रा. पिंपळे गुरव) याने  अभिषेक, आदिल, जुबेर आणि जेम्स यांच्या विरोधातील फिर्यादीनंतर सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लक्ष्मण हा बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घरा बाहेर उभा होता. त्यावेळी कारमधून आलेल्या चौघांनी जबरदस्तीने त्याला कारमध्ये बसवले. त्याला कामशेत येथे नेले आणि मारहाण करुन जखमी केले. यादरम्यान त्याच्याकडील मोबाईल, रोख रक्कम आणि कारची चावी काढून घेऊन त्याला तिथेच सोडण्यात आले. लक्ष्मण याचे गुन्हे दाखल असलेल्या पैकी एकाच्या नातेवाईक महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याने हा प्रकार घडला आसल्याचे समोर आले आहे.

Tags : Four Man Beaten one Young Man,  Immoral Relations, Pune, Crime, Pimpari,  Kidnapping