Mon, Jun 24, 2019 21:00होमपेज › Pune › पिंपरीत स्वाईन फ्लुचे रुग्ण आढळले

पिंपरीत स्वाईन फ्लुचे रुग्ण आढळले

Published On: Aug 19 2018 5:45PM | Last Updated: Aug 19 2018 5:45PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात काल, शनिवार, (दि. १८) स्वाईन फ्लुने एका ४३ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला. तर आता पुन्हा सात नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या वर्षी दोन रुग्णांचा मृत्यु झाला असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८ वर पोचली आहे. 

गेल्या आठवड्यापासून शहरात स्वाईन फ्ल्यूचे किमान दोन रुग्ण आढळत आहेत. तर, दोन दिवसात आठ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. यंदाच्या वर्षी १८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 

संशयित रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप केले जाते. अद्यापपर्यंत ३ हजार, ७३२ जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. शनिवारी (दि. १८) १२ जणांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. तर रविवारी एकाच्या घशातील द्रव पाठविण्यात आला आहे. अद्यापपर्यंत एकूण ९२ जणांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ९ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात आली.