Sun, Aug 25, 2019 19:48होमपेज › Pune › चाळीस हजार गावे  हागणदारीमुक्त

चाळीस हजार गावे  हागणदारीमुक्त

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 10 2018 1:03AMपुणे : प्रतिनिधी 

गेल्या 65 वर्षांत राज्यात केवळ 45 टक्के शौचालयांची निर्मिंती झाली होती. मात्र, भाजप सरकारच्या काळात 55 टक्क्यांवर शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यातील 351 तालुक्यांतील 27 हजार 667 ग्रामपंचायती आणि 40 हजार 500 गावे हागणदारीमुक्त झाली आहेत, असा दावा  पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी केला. 

स्वच्छ भारत अभियानअंतर्गत शासनाच्या वतीने पाणीपुरवठा, स्वच्छता व ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त स्वच्छता व ग्रामसभा दिंडीचा शुभारंभ लोणीकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, वासो संचालक डॉ.सतीश उमरीकर, उपायुक्त (विकास) चंद्रकांत गुडेवार आदी उपस्थित होते.

राज्यात 60 लाख शौचालये बांधली

स्वच्छ भारत मिशनवर या सरकारने केंद्र आणि राज्यसरकारने आतापर्यंत 4500 कोटी रुपये खर्च केले आहे. 2012 च्या बेस लाइन सर्वेनुसार शौचालयांची बांधून देण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून, अजून मोहीम संपलेली नसून 2012 च्या बेस लाइन सर्वे बाहेरील वंचित कुटुंबीयांनाही ही मनरेगाच्या माध्यमातून शौचालय बांधून देण्यात येणार आहेत. सन 2013-14 मध्ये 2 लाख 21 हजार 849, सन 2014-15 मध्ये 4 लाख 88 हजार 402, सन 2015-16 मध्ये 8 लाख 82 हजार 053, सन 2016-17 मध्ये 19 लाख 16 हजार 461 तर सन 2017-18 मध्ये 22 लाख 51 हजार 81 तर सार्वजनिक व सामूहिक शौचालय 2 लाख 81 हजार 292 अशी मिळून वैयक्तिक व सार्वजनिक 60 लाख 41 हजार 138 शौचालय बांधण्यात आली आहेत.