Sat, Sep 22, 2018 14:39होमपेज › Pune › पुण्यात माजी लष्करी अधिकाऱ्याची हत्या (video)

पुण्यात माजी लष्करी अधिकाऱ्याची हत्या (video)

Published On: Feb 04 2018 1:34PM | Last Updated: Feb 04 2018 4:40PMपुणे : पुढारी ऑनलाईन 

अनेक वर्षांपासून पुणे येथील कँप परिसरातील डॉ. कोयाजी रोडवरील फुटपाथवर जीवन व्यतीत करणारे माजी लष्कर अधिकारी रविंद्रकुमार बाली (वय ६५) यांची गुरूवारी मध्यरात्री हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर त्यांना ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सिमेंटच्या दगडाने त्यांच्यावर वार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले. याप्रकरणी सागर बाबूराव वाघमारे (२५, सर्व्हर्स क्वार्टर,) यांनी फिर्याद दिली होती. 

१७ वर्षे भारतीय लष्करात सेवा बजावल्यानंतर रविंद्र बाली निवृत्त झाले होते. गेल्या ५ वर्षांपासून बाली हे फुटपाथावर राहत होते. ‘गुरूवारी मध्यरात्री ३.३० च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शरीरावर अनेक वार करण्यात आल्याने अधिक रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असे वरिष्ठ पोलिस अधिकारी वसंत कुणवर यांनी सांगितले.  

काही दिवसांपूर्वी रविंद्र बाली यांच्या लष्करातील एका मित्राने त्यांचा एक व्हिडिओ फेसबूकवर शेअर केला होता. या व्हिडिओत, आपण लष्करात एकत्र होतो, तू माझ्यासोबत चल, आपण एकत्र राहू अशी समजूत घालत होता. यावर माझं मन इथेच फुटपाथवर रमतं, मला रोज अनेक लोक भेटतात त्यामूळे मी इथे खूश आहे. असे बाली म्हणाले होते. या व्हिडिओ व्हायरल झाला होता.