Wed, Jul 17, 2019 09:59होमपेज › Pune ›  अॅग्रो स्टारकडून मिरची शेतकर्‍यांना यशाचा मंत्र : सारंगी 

 अॅग्रो स्टारकडून मिरची शेतकर्‍यांना यशाचा मंत्र : सारंगी 

Published On: Feb 11 2018 8:27PM | Last Updated: Feb 11 2018 8:27PMपुणे : प्रतिनिधी  

अॅग्रोस्टारने मिरची शेतकर्‍यांना गुणवत्ता व उत्पादनवाढीवर कशा प्रकार भर द्यावा याचे मार्गदर्शन करीत ग्रामीण शेतकर्‍यांना यशाचा मंत्र दिला. असे प्रतिपादन, माजी कृषी सचिव उमेशचंद्र सारंगी यांनी केले. अॅग्रो स्टारच्या वतीने मिरची उत्पादक शेतकरी चर्चेचे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

 महिकोचे रिजनल बिझिनेस मॅनेजर श्रीपाद पाटील, ऍग्रोस्टारचे कृषीतज्ञ तेजस कोल्हे, नेबकिसान कंपनीचे मॅनेजर प्रमोद पाटील, ऍग्रोस्टारचे रितेश अलाडवार, नेबकिसान कंपनीचे मॅनेजर प्रमोद पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

सारंगी म्हणाले, ‘‘शेतीची मशागत, माती परीक्षण व ठिबक सिंचन आणि शेतीचे योग्य नियोजन अतिशय महत्वाचे आहे. हे नियोजन कशाप्रकारे करावे याचे प्रशिक्षण ऍग्रोस्टार शेतकर्‍यांना देत आहे. त्याचा अधिकाधिक शेतकर्‍यांनी लाभ घेतल्यास निश्‍चितपणे देशाच्या विकासास हातभार लागणार आहे.’’

त्याचबरोबर महिकोचे पाटील यांनी तेजा ४ या मिरची बियाणे व्हरायटीचे गुणधर्म व फायदे सांगितले.  फार्मर प्रोडूसर कंपनीची निर्मिती व त्याचे फायदे याबद्दल शेतकर्‍यांना संबोधित पाटील यांनी केले. चर्चासत्राला ६०० पेक्षा अधिक मिरची उत्पादक शेतकर्‍यांनी उपस्थिती दर्शिविली. अग्रोस्टारने अद्वितीय अश्या गोल्ड सर्विसचे उद्घाटन केले. गोल्ड सर्विसमध्ये पिकात येणार्‍या समस्या व योग्य पिक नियोजनाचे पर्याय याची पूर्ण माहिती शेतकर्‍यांना वेळोवेळी देण्यात येते.  मिरची पिकाच्या उच्च आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी अचूक सल्ला व पिकाचे नियोजन हे या गोल्ड सर्विसचे प्रमुख उद्धिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  मागील वर्षी ३० शेतकर्यांसोबत अग्रोस्टारने प्रायोगिक प्रकल्पावर ही संकल्पना राबिवली होती व प्रकल्पातील सर्व शेतकरयांचे उत्पन्न दुपटीहून अधिक वाढले होते आणि शेतकर्याना एकरी सरासरी २५ ते ३५  टन मिरचीचे उत्पादन मिळाले अशी माहिती रितेश अलाडवार यांनी सांगितली. प्रकाल्पाचे यश लक्षात घेता अग्रोस्टार ने ही सुविधा यावर्षी पासून अधिकृतपणे राबवण्याचा संकल्प केला आहे. अग्रोस्टार अपेडा संस्थेशी सलग्न होऊन या भागातील मिरची पिक कसे निर्यात करता येतील याबद्दलही प्रयत्नशील असल्याचे अलाडवार यांनी सांगितले.