Tue, Sep 25, 2018 01:25होमपेज › Pune › शिवनेरी किल्ल्यावर वनकर्मचार्‍यांची मद्यपार्टी

शिवनेरी किल्ल्यावर वनकर्मचार्‍यांची मद्यपार्टी

Published On: Feb 19 2018 1:35AM | Last Updated: Feb 19 2018 1:33AMजुन्नर  : वार्ताहर

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी (ता.  जुन्नर) येथील शिवाईदेवी मंदिरालगत जुन्नर वन विभागातील 5 कर्मचारी शनिवारी (दि. 17) रात्री दारू पीत बसलेले असताना कोरेगाव सातारा येथून शिवज्योत नेण्यासाठी आलेल्या तरुणांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता,  त्या कर्मचार्‍यांनी त्यांना अरेरावीची भाषा वापरल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

जुन्नर वन विभागातील चैतन्य सीताराम कांबळे,  शशिकांत गणपत मडके,  प्रशांत भाऊसाहेब जाधव,  संतोष महालिंग नवगिरे,  प्रकाश बापू मोधे (सर्व राहणार जुन्नर) यांच्याविरुध्द मुंबई दारूबंदी अधिनियम 65(ई),  83 नुसार गुन्हा दाखल  करून अटक करण्यात आली आहे.  

दत्तात्रय फापळे (रा.  पाडळी स्टेशन,  कोरेगाव,  जिल्हा सातारा) हे व त्यांचे मित्र किल्ले शिवनेरी येथे शिवज्योत नेण्याकरिता शनिवारी रात्री आलेले होते.  शिवनेरीवर जात असताना शिवाईदेवी मंदिरालगत 5 वन कर्मचारी दारू पीत असल्याचे त्यांना दिसून आले,  याबाबत हे तरुण चौकशी करीत असताना या वन कर्मचार्‍यांनी त्यांना अरेरावीची भाषा केली.  याबाबत त्यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.