Tue, Feb 19, 2019 06:02होमपेज › Pune › विदेशी गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती : उद्योगमंत्री

विदेशी गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती : उद्योगमंत्री

Published On: Feb 02 2018 1:43AM | Last Updated: Feb 02 2018 1:31AMपुणे :

देशाच्या औद्योगिक प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा अग्रणी राहिला आहे. निर्यातीत तो 35 टक्के इतका असून, परदेशी गुंतवणूकदारांनीही महाराष्ट्रालाच प्रथम पसंती दिली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

उद्योजकतेला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (एनएसआयसी) आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पबचत सांस्कृतिक भवन येथे आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी डॉ. पी. जी. एस. राव, डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, आर. व्ही. गुप्ते, मनोज लाल, संदीप बेडसाळे, आमदार गौतम चाबुकस्वार  उपस्थित होते. 

देसाई म्हणाले, मागासवर्गीय घटकांसाठी ज्या योजना आणल्या आहेत, त्याचा लाभ घेतला तरच त्या योजना पूर्ण होतील. सरकार एखादी योजना जाहीर करते, त्या योजनांची अंमलबजावणी कोणीतरी करण्याची गरज असते, असेही देसाई म्हणाले.