Mon, May 27, 2019 09:51होमपेज › Pune › पुढील पाच दिवस पूर्वमोसमी पावसाचे...

पुढील पाच दिवस पूर्वमोसमी पावसाचे...

Published On: May 13 2018 2:16AM | Last Updated: May 13 2018 1:43AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यात पुढील पाच दिवस पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आजपासून (रविवार, दि. 13) गुरुवारपर्यंत (दि. 17) राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडेल, असेही नमूद करण्यात आले आहे. आज (दि.13)  मध्य महाराष्ट्र, सोमवारी (दि. 14) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात,  मंगळवार (दि. 15) ते गुरुवारपर्यंत (दि. 17) दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी दुपारनंतर मेघगर्जनेसह व सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला गेला आहे. 

दरम्यान, गेल्या 24 तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला, तर उर्वरित राज्यांत हवामान कोरडे होते. राज्यात शनिवारीदेखील उष्णतेच्या झळा तीव्रच होत्या. विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट होती. 

तर कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाल्याचे हवामान विभागाने सांगितले.