Sun, May 26, 2019 13:22होमपेज › Pune › तरूणांचे इलेक्ट्रीक टॉवरवर चढून आंदोलन (Video)

तरूणांचे इलेक्ट्रीक टॉवरवर चढून आंदोलन (Video)

Published On: Aug 01 2018 3:57PM | Last Updated: Aug 01 2018 3:57PMआळेफाटा : वार्ताहर

सर्वत्र मराठा आरक्षाण मागणीसंदर्भात आंदोलने सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मराठा आरक्षणासंदर्भात बेल्हे येथे दोन तरूणांनी इलेक्ट्रीक टॉवर वर चढून आरक्षण न देणा-या शिवसेना, भाजप युती सरकारचा जाहीर निषेध केला. तसेच मोदी सरकार विरोध घोषणा देत ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतक-यांना न्याय कधी मिळणार ? असा परखड सवाल केला. 

तसेच आयोगाने अहवाल सादर करून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण जाहीर करावे अशा प्रकारची मागणी त्यानी केली. आमचे हक्काच्या मागण्यांचे निवेदन जोपर्यंत शासनातील वरीष्ठ अधिकारी स्विकारत नाही, तोपर्यंत आम्ही टॉवरवरून खाली उतरणार नाही. असा आंदोलकर्त्यांनी इशारा दिला.