Sun, Mar 24, 2019 12:34होमपेज › Pune › लष्करीभागातील जागेच्या ताब्यासाठी महामेट्रोचा पाठपुरावा

लष्करीभागातील जागेच्या ताब्यासाठी महामेट्रोचा पाठपुरावा

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 12:27AMपुणे : प्रतिनिधी 

शहरातील मेट्रोच्या कामांना गती देण्यासाठी महानगरपालिकेकडून येणार्‍या जागा महामेट्रोच्या ताब्यात आलेल्या आहेत. मात्र पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गिका क्रमांक 1 मधील खडकी ते रेंजहिल्स दरम्यानच्या जागा ताब्यात येणे बाकी आहे. या जागा लवकरात लवकर ताब्यात येऊन कामाला गती मिळावी यासाठी खासदार अनिल शिरोळे यांच्या बरोबर महामेट्रोची  नुकतीच बैठक पार पडली. याप्रसंगी भाजपचे खासदार अनिल शिरोळे आणि महामेट्रोचे उपसंचालक रामनाथ सुब्रम्हण्यम उपस्थीत होते. 

मार्च महिन्यात महामेट्रोला महानगरपालिकेकडून काही जागांचा ताबा मिळाला आहे. मेट्रोच्या बांधकामातील महत्त्वाच्या असणार्‍या  मेट्रोच्या स्टेशन आणि डेपोसाठी आवश्यक असलेल्या स्वारगेट आणि कोथरुड कचरा डेपोच्या जागांचा यात समावेश आहे. सुमारे 35 एकर जागा महामेट्रोच्या ताब्यात सध्या आली असून, यापैकी अनेक ठिकाणी मेट्रोच्या कामांना सुरुवात झालेली आहे. यातील कोथरुड कचरा डेपो येथील 12.11 हेक्टर जागा महामेट्रोला मेट्रो डेपोसाठी मिळाली आहे. 

मात्र अजुनही महामेट्रोच्या ताब्यात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गामाधील येणार्‍या लष्करी भागातील जागा ताब्यात आलेली नाही. ही जागा लवकरात लवकर मिळावी यासाठी महामेट्रोकडून पाठपुरावा सुरू आहे. खडकी ते रेंजहिल्स या दरम्यान मेट्रोचे स्टेशन्स, पार्किंग यासाठी ही जागा वापरण्यात येणार आहे. त्यासाठी या मार्गाच्या बांधकामाची होत असलेली प्रगती पाहता या मिळणे आणि त्याचे काम सुरू होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

खडकी ते रेंजहिल्स यादरम्यानची मेट्रो कामासाठी लागणारी लष्करी भागातील जागा मिळावी यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. आम्ही खासदार अनिल शिरोळे यांच्यासाठी बैठक घेऊन ही जागा लवकर ताब्यात मिळवी यासाठी बोलणी केली आहे. संरक्षण मंत्रालय आणि स्थानिक संरक्षण प्राधिकरण यांच्याकडे ही जागा प्रास्तावित असून त्याचा निर्णय लवकर व्हावा यासाठी भाजप खासदार अनिल शिरोळे यांच्यासह प्रयत्न करण्यात येणार आहेत.  - रामनाथ सुब्रम्हण्यम,व्यवस्थापकिय उपसंचालक, महामेट्रो