Mon, Apr 22, 2019 01:42होमपेज › Pune › पुण्यातील रस्त्यांवर वाहतात ओढे

पुण्यातील रस्त्यांवर वाहतात ओढे

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 23 2018 12:53AMपुणे : अक्षय फाटक

पावसाळ्यात रस्त्यात पाणी साचू नये म्हणून, पावसाळापूर्व साफसफाईची जबाबदारी महापालिकेची असतानाही वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेऊन शहरात पाणी साचणार्‍या 43 ठिकाणांची यादीच महापालिकेला दिली आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने केवळ काही ठिकाणीच काम सुरु करून संथ कारभाराचे दर्शन घडविले आहे. त्यामुळे ‘रस्त्यात पाणी की पाण्यात रस्ते‘, हेच समजत नसून, स्मार्टसिटीच्या शहराची पावसाळ्यात होणार्‍या या केवील वाण्या अवस्थेकडे पुण्याच्या कारभार्‍यांनी गांभिर्यांने लक्ष देण्याची गरज आहे. 

एकेकाळी निसर्गरम्य असणर्‍या पुण्यात मानवी चुकांमुळे ऐन पावसाळ्यात रस्त्यांवर ओढे वाहत असल्याचे वास्तव समोर येते. पेठांमध्ये वसलेल्या पुण्याचा विस्तार काही वर्षात झपाट्यांने झाला. शिक्षण आणि प्रत्येकाच्या हाताला काम मिळवून देणार्‍या या शहराने अवाढव्य स्वरूप धारण केले. एकीकडे शहर स्मार्टसिटीच्या दिशेने निघाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, अनेकदा दुरूस्ती करूनही रस्त्यांवरील सतत पडणारे खड्डे आणि त्याहूनही पावसाळ्यातले शहराचे दिसणारे भयंकर वास्तव.

साफसफाईसाठी कोट्यावंधी रुपये खर्चूनही पहिल्याच पावसात रस्त्यांवर डबकी साचतातच यंदा महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांपूर्वी वाहतुक पोलिसांनीच 43 रस्त्यांवर असणार्‍या खड्डे आणि खोलगट भागामुळे ओढ्यासारखी स्थिती होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.वाहतूक पोलिस विभागाने महापालिका प्रशासनाला अशा ‘वाटर लॉगिंग पाँईट’ची यादीच दिली आहे. त्यावर उपाययोजना करण्याचे सूचविले आहे. याठिकाणी साचलेल्या पाण्यांमुळे वाहतूक कोेंडी होत आहे. नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर, साचलेल्या पाण्यामुळे खड्डे ओळखू येत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यात आहे. अनेक ठिकाणी गुडघ्यांपर्यर्ंत पाणी साचत असून, त्यामुळे वाहन चालविणे तर सोडाच पायी चालणेही कठीण होत आहे. काल (गुरुवारी) झालेल्या पावसात अशी स्थिती पुन्हा समोर आलीच. ठिकाणांची यादी दिल्यानंतरही काम न झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली