Mon, Mar 25, 2019 13:33होमपेज › Pune › कात्रज येथील ध्वजस्तंभ तिरंग्याविना

कात्रज येथील ध्वजस्तंभ तिरंग्याविना

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 12:36AMकात्रज : महेंद्र संचेती 

वर्षातून तीनशे पासष्ठ दिवस व चोवीस तास फडकत राहण्याची मान्यता मिळालेल्या भारतातील सहाव्या व महाराष्ट्रातील दुसर्‍या सर्वात उंच ध्वजस्तंभ म्हणून ओळख निर्माण केलेला कात्रजच्या ऐतिहासिक नानासाहेब पेशवे तलावावरील ध्वजस्तंभ विविध कारणामुळे फडकत नसल्याचे चित्र आहे . भारतीय प्रजासत्ताक दिन तोंडावर असूनही अद्याप या ठिकाणी तिरंग्याचे दर्शन होत नसल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे . 

कात्रजच्या ऐतिहासिक तलावावर ऑगस्ट 21016 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या संकल्पनेतून व पुणे महापालिकेद्वारे या ठिकाणी 237 फूट  72 मीटर  उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या ध्वजस्तंभाचे लोकार्पण झाले. सुरुवातीच्या काळात हा ध्वजस्तंभ नियमानुसार फडकत होता . मात्र त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर सत्तांतर झाले. प्रभागातील कारभारी बदलल्याने या ध्वजस्तंभाकडे दुर्लक्ष झाले . 

वार्‍याने धजस्तंभ फाटेल याचा पूर्व अंदाज म्हणून नगरसेवक मोरे यांनी त्यासाठी पुढची तयारी केली होती. जर तो फाटलाच तर असे एकूण 6 झेंडे घेण्यात आले होते.  शिवाय प्रत्येकी भगवे, हिरवे, आणि पांढरे कापड प्रत्येकी 5 मीटर, 3 ही रंगाचे 3 दोर्‍याचे नवीन बंडल झेंडा फाटला तर तो जाग्यावर शिवता यावा त्यासाठी हजारो रुपये किमतीची नवी कोरी मशीन आणण्यात आली होती. आज 1 वर्षानंतर पाहिले सगळे जाग्यावर धूळखात पडून आहे. मागील 15 ऑगस्ट 2016 ते 23 फेब्रुवारी 2017 पर्यंत सतत 6 महिने तो फडकत होता फाटला तर तो नगरसेवक मोरे हे स्वखर्चातून दुरुस्त करून फडकावीत ठेवत होते. 

सत्तातनरानंतर या ध्वजस्तंभाकडे दुलर्क्ष झाल्याने पर्यटकांच्या आनंदात विरजण पडले आहे. येत्या प्रजासत्ताक दिनापासून तरी हा ध्वजस्तंभावर तिरंगा नियमित फडकत राहाव, अशी मागणी सर्वच स्तरावरून होत आहे. 

कात्रज तलावावर पर्यटकांची गर्दी व्हावी . यासाठी पुणे महापालिकेतर्फे ध्वजस्तंभासह , याठिकाणी म्युझिकल फाउंटन सुरु करण्यात आले होते . मात्र सत्तांतर झाल्यानंतर झेंडाही दररोज फडकत नाही आणि म्युझिकल फाउंटन सुद्धा बंद आहे . यामागे स्थानिक नेत्याचा हात असल्याचे बोलले जात आहे .