Sat, May 25, 2019 22:49होमपेज › Pune › राज्यात साडेपाच हजार अर्ज निकाली

राज्यात साडेपाच हजार अर्ज निकाली

Published On: Jan 23 2018 1:25AM | Last Updated: Jan 23 2018 1:08AMपुणे : प्रतिनिधी

धर्मादाय कार्यालयाने सुरू केलेल्या झिरो पेंडन्सी अभियानाद्वारे राज्यात 15 ते 20 जानेवारीदरम्यान पाच हजार 797 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. त्यापैकी एक हजार 18 अर्ज पुणे विभागातील आहेत. 

राज्यात धर्मादाय विभागाची नऊ विभाग कार्यालये आहेत. या विभागातील सह धर्मादाय आयुक्‍तांनी झिरो पेंडन्सी अभियान राबवून प्रलंबित अर्ज, विनावाद अर्ज निकाली काढावेत, असे परिपत्रक धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे यांनी काढले होते.

त्यानुसार 15 ते 20 जानेवारीदरम्यान राबविण्यात आलेल्या या अभियानात नऊ विभागाअंतर्गत हे अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे हे काम अद्याप सुरू असून ते 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. मुंबई विभागात सर्वाधिक 1235, नाशिक- 1036 व पुणे विभागात 1018 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.