Sun, Apr 21, 2019 06:01होमपेज › Pune › चाकणमध्ये पाच दुकाने आगीत खाक

चाकणमध्ये पाच दुकाने आगीत खाक

Published On: May 13 2018 2:16AM | Last Updated: May 13 2018 1:32AMचाकण : वार्ताहर

चाकण- शिक्रापूर रस्त्यावरील पाच गाळ्यांना शनिवारी (दि. 12) पहाटे चार वाजता आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाला तीन 
तास लागले. 

सुदैवाने, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दुकानांमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त होत असून, आगीचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शनिवारी पहाटे चारच्या सुमारास आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर अग्निशमन विभागाला तातडीने याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर तातडीने एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, परंतु तोपर्यंत येथील एक हॉटेल, स्टॅम्प व्हेंडर, वकिलांची कार्यालये या इतर पाच गाळ्यांनी देखील पेट घेतला होता. लाकडी फर्निचर; तसेच कार्यालयातील वस्तू, कम्प्युटर, प्रिंटर आदी साहित्याने पेट घेतल्याने अवघ्या काही मिनिटांमध्ये आगीने उग्र रूप धारण केले. त्यामुळे अग्निशमन विभागाच्या केवळ दोन गाड्यांना ही आग आटोक्यात आणणे शक्य होत नव्हते. 

अखेर युवकांनी अग्निशमन विभागाला मदत करीत संबंधित दुकानांची शटर उचकटून उघडली.  त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी अथक परिश्रम करून उघडण्यात आलेल्या दुकानामध्ये पाण्याचा मारा करीत ही आग सकाळी सात वाजेचे सुमारास संपूर्णपणे आटोक्यात आणली.