Sat, Jul 20, 2019 10:36होमपेज › Pune › संतापजनक! बाललैंगिक अत्याचाराच्या पाच घटना 

संतापजनक! बाललैंगिक अत्याचाराच्या पाच घटना 

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 12:43AMपुणे : प्रतिनिधी 

अवघे अर्धे जग असुरक्षित असून, शहरातील धायरी गाव, वडगावशेरी, खराडी, औंध रोड आणि हडपसर अशा विविध पाच ठिकाणी बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे उघडकीस आले आहेत. याप्रकरणी मुलीवर अत्याचार करणार्‍या पित्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. या प्रकरणी चौघांना पोलिस कोठडी तर एकाची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.  

धायरी गाव येथील तीन मुलींसोबत राहत असताना दहा वर्षाच्या पीडित मुलीवर बलात्कार करणार्‍या तसेच नग्न अवस्थेत बाथरूममध्ये अंघोळ करून 16 आणि 12 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधम पित्याला सिंहगडरोड पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता 16 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावन्यात आली आहे. 

आरोपी हा 52 वर्षाचा असून तो त्याच्या तीन मुलींसोबत राहतो. 2016 पासून आरोपी हा राहत्या घरातील बाथरूमध्ये नग्न अवस्थेत अंघोळ करून मुलींच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत होता. त्याने त्याच्या दहा वर्षाच्या मुलीवर अशाच पध्दतीने वारंवार बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान त्याची पोटेन्सी टेस्ट करायची आहे, पीडितांच्या बहिणी व इतर नातेवाईकांकडे तपास करायचा आहे. त्याने त्याच्या इतर मुलींवरही अशा प्रकारचे कृत्य केले आहे का ? याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने ती मंजूर केली.

वडगाव शेरी येथून 17 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी अक्षय दिलीप गिरीगोसावी (22, रा. मोझेवाडी, येरवडा) याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता 13 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दि. 31 मार्च रोजी दपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अक्षयने पीडित मुलीचे अपहरण केले होते. त्यानंतर तो तिला त्याच्या लोहगाव येथील बहिणीच्या घरी घेऊन गेला. तेथे त्याने तिच्या लैंगिक अत्याचार केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडीलांनी फिर्याद दिली. 

अल्पवयीन मुलीवर अत्याचार     

अल्पवयीन मुलीचे खराडी येथून अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी रोहित लहू ढवळे (20, रा. उबाळेनगर, वाघोली) याला 13 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

औंधरोड येथून एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला काळेवाडी येथे ठेवून तिच्यावर 25 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान लैंगिक अत्याचार करणार्‍या महेश उर्फ सॅम रविंद्र पाटोळे (रा. अहमदनगर) याला खडकी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने 13 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दोघेच पीडित मुलगी आणि महेश एकाच वेळी बेपत्‍ता झाल्याने त्यानेच तिचे अपहरण केल्याचे स्पष्ट झाले. वरील  प्रकरणामध्ये अतिरिक्‍त सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी चौघांनाही पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली. 

पाचव्या घटनेत क्‍लासवरून घरी जात असताना अल्पवयीन मुलीला भर रस्त्यात अडवून तिचा हात पकडून विनयभंग करणार्‍या एकाला हडपसर पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अजय नंदु होले (21, रा. गाडीतळ, हडपसर) असे पोलिस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत 15 वर्षीय मुलीने पोलिसांत फिर्याद दिली आहे.  

 

Tags : pune, pune news, crime, child sexual abuse, Five incident,