Thu, Apr 25, 2019 21:25होमपेज › Pune › पहिले ‘हनी पार्क’ महाबळेश्वर येथे

पहिले ‘हनी पार्क’ महाबळेश्वर येथे

Published On: May 25 2018 1:11AM | Last Updated: May 24 2018 11:00PMपुणे : प्रतिनिधी

महाबळेश्वर येथे दोन एकर जागेत लवकरच देशातील पहिले ‘हनी बी पार्क’ सुरू करण्याची योजना असून, यामध्ये  मधुमक्षिकापालन कसे करावे, कसे केले जाते, त्याच्या पद्धती, मध कसा काढावा, मधाचे पोळे कसे असते, मधुमक्षिकांचे काम कसे चालते यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मधुमक्षिकांबद्दलच्या जागृतीबरोबरच या ठिकाणी एक टुरिस्ट हब कम माहिती केंद्र बनविण्याचा आमचा एक प्रयत्न असल्याचे मत महाराष्ट्र सरकारच्या खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांनी व्यक्‍त केले.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व हातकागद संस्था, संशोधन, प्रशिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मधुमक्षिका संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक दीप वर्मा, मध उद्योग तज्ज्ञ नाना क्षीरसागर, मध उद्योजक प्रशांत सावंत, सारिका सासवडे उपस्थित होते.

चोरडिया म्हणाले, मधुमक्षिकांकडून 19 प्रकारचे मध मिळतात, मधुमक्षिका पालनाशिवाय त्याच्याशी संबंधित 46 प्रकारचे व्यवसाय करू शकतो. यातूनच राज्य सरकारच्या पुढाकाराने खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ‘मधुमक्षिका मित्र’ हा उपक्रम आम्ही हाती घेत आहोत.