Thu, Jul 18, 2019 12:21



होमपेज › Pune › स्वतःकडील पिस्तुलातून गुन्हेगारावर गोळीबार

स्वतःकडील पिस्तुलातून गुन्हेगारावर गोळीबार

Published On: Mar 24 2018 1:53AM | Last Updated: Mar 23 2018 11:18PM



पिंपरी : प्रतिनिधी 

रस्त्यात लावलेली दुचाकी काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तडीपार सराईत गुंडावर गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र, जखमी गुंडाकडील पिस्तुलातूनच त्याच्यावर गोळीबार केल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांकडून दोन बेकायदेशीर पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत. ही घटना चिंचवड येथील वाल्हेकरवाडीमधील शिवाजी चौक येथे सोमवारी (दि. 19) रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली होती.

दौला जबार नदाफ (27, रा. पिंपळे गुरव), अजमत शेख (28, रा. वेताळनगर, चिंचवड), सद्दाम शौकत अली नदाफ (27, रा. बिजलीनगर, चिंचवड) आणि शिवाजी तानाजी सोलणकर (21, रा. मोरयानगर, चिंचवड) या चौघांना अटक केली आहे, तर जयवंत भगवंत चितळकर (30, रा. तुकारामनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्यावर गोळीबार झाला होता; तसेच त्याचा मित्र नीलेश कोळपे (रा. तुकारामनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड) हाही जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी जयवंत आणि नीलेश हे दोघे दारू पिऊन सोमवारी रात्री वाल्हेकरवाडीमधील शिवाजी चौकात बसले होते. त्यांनी त्यांची दुचाकी रस्त्यात उभी केल्याने रस्त्याने जाणार्‍या वाहनांना अडथळा येत होता. एका कार चालकाने रस्त्यात लावलेली दुचाकी काढण्यास सांगितले. यावरून कार चालक आणि त्यांच्यात वादावादी झाला. काही वेळाने कार चालकाने त्याच्या इतर साथीदारांना तेथे आणले व दोघांना बेदम मारहाण केली. या वेळी चितळकर याने त्याच्याकडे असणारे पिस्तूल बाहेर काढले आणि दौलाच्या दिशेने रोखले. त्या वेळी एकाने ते पिस्तूल त्याच्याकडून काढून त्याच्यावर गोळीबार केला. यामध्ये चितळकर जखमी झाल्याचे तपासात समोर आले आहे.

परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, पिंपरी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सतीश पाटील, चिंचवडचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे, विनायक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सतीश कांबळे यांच्या पथकाने माहिती काढून चौघांना अटक केली आहे. 

 

Tags : pimpri, pimpri news, crime, Hooligan, Firing,