Thu, Apr 25, 2019 11:28होमपेज › Pune › गाडी जाळ्याची तक्रार दिल्याने माय-लेकांवर केला गोळीबार

गाडी जाळ्याची तक्रार दिल्याने माय-लेकांवर केला गोळीबार

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 15 2018 12:41AMपुणे : प्रतिनिधी 

चारचाकी वाहन जाळणार्‍यांविरोधात पोलिसात तक्रार देण्याच्या कारणावरून आई आणि मुलाला घराबाहेर काढून गोळीबार करत दोन भावांना कोयत्याने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रामटेकडी येथे मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी आठ जणांवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विक्कीसिंग डीडीसिंग कल्याणी, विक्कीसिंग जालिंदरसिंग कल्याणी, मख्खनसिंग कल्याणी, हुकुमसिंग डीडीसिंग कल्याणी, खत्रासिंग अजितसिंग कल्याणी, सचिन शेरसिंग बावरी, जगदिप शेरसिंग कल्याणी, जॉकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी (सर्व रा. रामटेकडी, हडपसर ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर उजालासिंग प्रभूसिंग टाक (24, रामटेकडी हडपसर) या तरुणाने फिर्याद दिली आहे.  

रविवारी रात्री  उजालासिंग टाक याची घरासमोर पार्क केलेली स्कॉर्पिओ  जाळण्यात आली होती. ही चारचाकी विक्कीसिंग डीडीसिंग कल्याणी याने त्याच्या साथीदारांसह जाळली असल्याचे उजालासिंग टाक याला समजल्यानंतर तो  त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देणार होता. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास त्याची आई याबाबत बडबडत होती. त्यावेळी विक्कीसिंग कल्याणी व त्याचे इतर सात साथीदार हातात कोयता व बंदूक घेऊन तेथे आले.

विक्कीसिंग जालिंदरसिंग कल्याणी याने फिर्यादीच्या आईला घराबाहेर काढून तिच्या कपाळावर बंदूक लावली. त्यानंतर बंदूकीने जखमी केले. उजालासिंग टाक तिला वाचविण्यासाठी गेल्यावर कल्याणी याने त्याच्यावर गोळीबार केला.  तसेच घरातही तोडफोड करून सर्वजण पसार झाले. वानवडी पोलिस आठ जणांचा शोध घेत असून पुढील तपास सुरु आहे.