Fri, May 24, 2019 08:40होमपेज › Pune › अग्निशामक अधिकारी व फायरमनला लाच स्विकारताना पकडले

अग्निशामक अधिकारी व फायरमनला लाच स्विकारताना पकडले

Published On: May 20 2018 10:23AM | Last Updated: May 20 2018 10:23AMपिंपरी : प्रतिनिधी

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्राच्या बदल्यात  सोळा हजार रुपयांची लाच स्विकारणार्‍या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या सब ऑफिसर आणि फायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबीने) रंगेहाथ पकडले. ही कारवाई अग्निशामक विभागाच्या पिंपरी, संत तुकारामनगर येथील कार्यालयात शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास करण्यात आली.

सब ऑफिसर उदय माधवराव वानखेडे ( ५२, रा. मदन मोहन हौसिंग सोसायटी, कामगार नगर, पिंपरी) आणि फायरमन अनिल सदाशिव माने (३२, रा. शुभारंभ कॉलनी काळे कॉलनी आळंदी) या दोघांना सोळा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पडकले आहे. तक्रारदार यांचे वाकड सर्व्हे क्र १८६ येथे बांधकाम चालू होते. बांधकामाचे फायर ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी तक्रारदार यांनी अग्निशामक केंद्र येथे अर्ज केला होता.  त्यासाठी वानखेडे यांनी प्रोव्हिजनल फायर ना हरकत प्रमाणपत्राची फाइलची पूर्तता करून वरिष्ठांकडे पाठविली होती. तक्रारदाराला त्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र देखील दिले होते. परंतु, या मोबदल्यात वानखेडे आणि माने यांनी तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची मागणी केली.

तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसबीने शनिवारी वानखेडे यांना तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची आणि माने याला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.