Sat, Jul 20, 2019 23:40होमपेज › Pune › आगीत तीन घरे खाक 

आगीत तीन घरे खाक 

Published On: Dec 18 2017 2:40AM | Last Updated: Dec 18 2017 1:33AM

बुकमार्क करा

पुणे / बिबवेवाडी :  प्रतिनिधी 

मार्केट यार्ड येथील आंबेडकरनगरमध्ये शॉर्टसकिर्र्टमुळे लागलेल्या आगीत तीन घरे जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी सव्वा वा. घडली. या आगीची झळ  चार ते पाच घरांना पोहोचली. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. 

मिळालेल्या माहितीनुसार,  आंबेडकरनगर येथे असलेल्या  घराला शनिवारी दुपारी सव्वाच्या सुमारास  शॉर्टसर्किटमुळे आग लागली.  आग लागताच स्थानिक नागरिकांनी घरातील साहित्य बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर ही आग शेजारील घरांमध्ये पसरली. तीन घरांत आगीने  रौद्ररूप धारण केले. याबाबत अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमनचे दोन बंब दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासाच्या आत आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला; मात्र शेजारच्या चार ते पाच घरांना आगीची झळ पोहोचली.  लखन अरे व त्याच्या कार्यकर्त्यांनी घरातील साहित्य बाहेर काढले व इतर मदत कार्य केले.  या आगीमध्ये हजारोचे नुकसान झाल्याची शक्यता आहे.  आंबेडकर वसाहतीमधील ही चौथी आगीची घटना असून, वसाहतीमध्ये आगीचा बंब जाण्यासाठी जागा नसल्याने  अनेक अडचणी आल्या.