होमपेज › Pune › चिखली येथे स्फोट होऊन कंपनीला आग

चिखली येथे स्फोट होऊन कंपनीला आग

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 04 2017 1:02AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनधी

चिखलीतील शेलारमळा येथील करुणा डिस्लेशन या पेंटंच्या कंपनीला रविवारी (दि.3) सायांकाळी साडे पाचच्या सुमारास स्फोट होऊन आग लागली आहे. 

पिंपरी अग्निशामकदल सहा आणि खासगी दोन बंबानी अडीच तासात आग आटोक्यात आणली. सुरुवातीला चार बंबानी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र आग मोठी असल्याने मनपाच्या आणखी दोन आणि खासगी कंपनीचे बंब बोलवण्यात आले.  

युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम करून अडीच तासात आग आटोक्यात आली. निगडी पोलिसही घटास्थळी दाखल झाले होते. पेंटमध्ये फिनेल मिक्स करण्याचे काम ही कंपनी करते. मात हा स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही.