Wed, Nov 14, 2018 17:31होमपेज › Pune › मार्केटयार्डमधील  गोदामाला भिषण आग

मार्केटयार्डमधील  गोदामाला भिषण आग

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

मार्केटयार्ड परिसरातील गेट क्रमांक नऊ येथे असणार्‍या बारदान्याच्या गोदामाला सोमवारी दुपारी भिषण आग लागली. या अगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता अग्निशामक दलाकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

मार्केटयार्ड भागातील गेट क्रमांक नऊ येथे वखार महामंडळ लेनमध्ये ठक्कर यांचे बालाजी ट्रेडिंग कंपनी नावाचे गोदाम आहे. 8 बाय 50 फुटाचे हे गोदाम आहे. याठिकाणी धान्याच्या मोकळ्या पोत्यांची साठवणूक करण्यात येते. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोती (गोण्या) ठेवण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक गोदामातून धूर येत असल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली. तसेच, आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचच्या ज्वळा मोठ्या प्रमाणात येत असल्याने नागरिकांचे प्रयत्न अपुरे पडले. 

अग्निशामल दलाच्या दोन गोड्या आणि दोन पाण्याचे टँकरसह जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, मोकळी पोती असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. या अगीची झळ शेजारी असणार्‍या काही दुकानांनीही पोचली. अग्निशामक दलाच्या जवानांनी एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. तसेच, काही वेळ कुलींग केले. त्यानंतर पुर्ण आग विझवली. दुपारच्या वेळी आग लागल्यानंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूकीलाही अडथळा निर्माण झाला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. 

Tags : Fire, grain shop, market yard, pune, pune news 


  •