होमपेज › Pune › कात्रज  : सोसायटीच्या पार्किंगमध्ये भीषण आग 

कात्रज  : सोसायटीच्या पार्किंगमध्ये भीषण आग 

Published On: Jan 12 2018 9:45AM | Last Updated: Jan 12 2018 9:45AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

कात्रज परिसरातील माणिकमोती सोसायटीच्या पार्किंगमधील एका खोलीला आज पहाटे भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच पहिल्या मजल्यावर राहणऱ्या दोघांनी भीतीपोटी उड्या मारल्या. यात दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत. अग्निशामक दलाने वेळीच घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

या आगीत सोसायटीच्या पार्किंगमधील खोलीतील साहित्य जळून खाक झाले आहे. तर, शेजारी पार्किंग केलेल्या 3 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.