Mon, Jun 18, 2018 14:41होमपेज › Pune › पिंपरी: भीषण आगीत भंगाराचे दुकान जळून खाक

पिंपरी: भीषण आगीत भंगाराचे दुकान जळून खाक

Published On: Mar 14 2018 8:57AM | Last Updated: Mar 14 2018 8:55AMपिंपरी : प्रतिनिधी 
वाल्हेकरवाडी येथे भंगाराच्या दुकानला शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेजारची तीन दुकाने जळून खाक झाली. ही घटना  मंगळवारी (ता.१३) रात्री घडली. वाल्हेकरवाडी येथील भंगाराच्या दुकानाला रात्री ११ च्या सुमारास आग लागली.

आगीची माहिती मिळताच प्राधिकरण, रहाटणी आणि संत तुकारामनगर अग्निशामक मुख्यालयातून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली. मात्र, तोपर्यंत भंगाराचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले होते. तर बाजूला असलेले गॅरेज व फॅब्रिकेशनच्या दुकानालाही मोठ्या प्रमाणात झळ बसली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.