Tue, Aug 20, 2019 04:35होमपेज › Pune › मस्तानीचा चमचा पडला सात हजार रुपयांना

मस्तानीचा चमचा पडला सात हजार रुपयांना

Published On: May 30 2018 8:22AM | Last Updated: May 30 2018 8:22AMपुणे : प्रतिनिधी

महापालिका भवनातील महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीसाठी मस्तानी पाठवून त्याबरोबर प्लॅस्टिक चमचे पाठवणे एका हॉटेल व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले. या बैठकीस उपस्थित पालिकेच्या घनकचरा विभागातील अधिकार्‍यांनी यासंबंधी कर्मचार्‍यांना सूचना दिल्याने या हॉटेलवर कारवाई करून 7 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मागील आठवड्यात झालेल्या या बैठकीला महिला बालकल्याण समितीचे सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. कार्यपत्रिकेवर चर्चा झाल्यानंतर एका हॉटेलमधून उपस्थितांसाठी मस्तानी मागवण्यात आली. हॉटेल व्यावसायिकाने मस्तानी सोबत प्लॅस्टिकचे चमचे पाठविले. सर्वांनी मस्तानीचा मनमुराद आस्वाद घेतला; मात्र घनकचरा विभागाच्या अधिकार्‍याने प्लास्टिक चमच्यांचा वापर हेरला आणि संबंधित अधिकार्‍यांना कारवाईचे आदेश दिले. मग कारवाई पथकाने संबंधीत हॉटेलमध्ये जाऊन व्यावसायिकाला दंड 7 हजार रुपयांचा दंड ठोठावला.