Tue, Apr 23, 2019 18:22होमपेज › Pune › शहरातील मिळकतींचा ‘सॅटेलाईट’द्वारे शोध

शहरातील मिळकतींचा ‘सॅटेलाईट’द्वारे शोध

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 1:10AMपिंपरी : प्रतिनिधी

महापालिका व नगरपालिकांनी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून आपला ‘आर्थिक’ कारभार सक्षम करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध पावले उचलण्यात येत आहेत. त्या अंतर्गत शहरातील मिळकतीचे सॅटेलाईटद्वारे सर्वेक्षण करून नोंद नसलेल्या मिळकतीचा शोध घेण्यात येणार आहे. 

शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात बांधकामे करून निवासी व व्यापारी इमारती आणि बंगलो उभे राहत आहेत. दर दिवशी शहरातील निवासी व व्यापारी बांधकामांच्या मिळकतीची भर पडत आहे. मात्र, त्या प्रमाणात त्या मिळकतीची नोंद पालिकेच्या करसंकलन कार्यालयात केली जात नाही. त्यामुळे पालिकेचे दरवर्षी कोट्यवधी रूपयांचे मिळकतकरापोटी मिळणारे उत्पन्न बुडत आहे. सध्या शहरात नोंद असलेल्या मिळकतीची संख्या 4 लाख 83 हजार 463 आहे. 

त्यासाठी पालिकेच्या वतीने सॅडेलाईटद्वारे शहरातील सर्व मिळकतीचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहेत. त्यातून नवे बांधकामे व वाढीव बांधकामांचा शोध घेतला जाणार आहे. त्यासंदर्भात गेल्या वर्षी झालेल्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात आला आहे. त्या कामासाठी खासगी एजन्सीची नेमणूक केली जाणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर संगणक प्रणालीच्या माध्यमातून त्या कामाचा आराखडा तयार केला जात आहे. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष काम सुरू केले जाणार आहे. मुदतीमध्ये मिळकतकर भरल्यास पालिकेच्या वतीने सवलत दिली जाते. 30 जूनपूर्वी थकबाकीसह मिळकतकराची संपूर्ण रक्कम भरल्यास माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक किंवा त्याचे  पत्नी यांचे स्वत: राहत असलेल्या एका निवासी घराला सामान्यकरात 50 टक्के सुट दिली जाते.

केवळ महिलाच्या नावे असलेल्या निवासी घराला सामान्यकरात 50 टक्के सूट आहे. चाळीस व त्यापेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या व्यक्तीस सामन्या करात 50 टक्के सवलत आहे. ‘ग्रीन बिल्डींग रेटींग सिस्टीम’ (पर्यावरणपूरक) राबविणार्‍या  मिळकतीस 5 ते 15 टक्के सूट आहे. थकबाकीसह मिळकतकराची संपूर्ण रक्कम आगाऊ भरल्यास निवासी मिळकतीना 10 टक्के आणि बिगरनिवासी, मित्र, औद्योगिक, मोकळ्या जमिनीसाठी 5 टक्के सुट आहे. एक एप्रिल ते 31 मार्च कालावधी संपूर्ण बिलांची रक्कम भरल्यास संरक्षण दलातील शौर्यपदकधारक व माजी सैनिकांच्या विधवा याचे नावे मालमत्तांना मालमत्ताकरात 100 टक्के सूट आहे. संरक्षण दलातील अविवाहित शहिद झालेल्या सैनिकांया नामनिर्देशित मालमत्तेस मालमत्ताकरात 100 टक्के सुट आहे. ऑनलाईन 30 जूनपर्यंत भरणा केल्यास अतिरिक्त 5 टक्के सवलत आहे. त्यापुढे 31 मार्चपर्यंत ऑनलाईन भरणा केल्यास सामान्यकरात 2 टक्के सुट आहे. 30 जूनपूर्वी आगाऊ थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर भरणा करून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे. 

Tags : Pimpri, Findings, citys, Satellites, search