Thu, Apr 25, 2019 06:21होमपेज › Pune › अखेर विहिरीवर स्लॅब टाकण्याचे काम सुरू

अखेर विहिरीवर स्लॅब टाकण्याचे काम सुरू

Published On: Apr 21 2018 1:19AM | Last Updated: Apr 21 2018 12:28AMधायरी : वार्ताहर 

‘डी पी रस्त्याच्या मधोमध विहीर... तीन वर्षे काम रखडले  याबाबात दै. पुढारीने सतत वृत्त दिल्याने अखेर या विहिरीवर स्लॅब टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.सिंहगडरोड परिसरातील वडगाव बु॥ येथील माणिक बाग परिसरात गोयल गंगा ते सिंहगड कॉलेज या तीस मीटर रस्त्यावरच मधोमध विहीर आहे. या विहिरीने संपूर्ण डी.पी. रस्ताच व्यापल्यामुळे येथून जाणा-या वाहनांना जेमतेम 10 ते 15 फुटच रस्ता शिल्लक राहिलेला आहे. हि विहीर येणा-या जाणा-यासाठी अत्यंत धोकादायक आहे. तीन वर्षापासून या विहिरीवर टाकण्यात येणारे स्लॅबचे काम रखडलेले आहे. या परिसरात गंगा भाग्योदय सोबा ऑप्टीमा, सह्याद्री हाईटस , इत्यादी मोठ्या सोसायट्या असून एक हजार कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत.

सिंहगड कॉलेज पर्यंत हा डी पी रस्ता जोडलेला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरून वाहनांची व नागरिकांची वर्दळ सुरु असते रात्रीच्या वेळी येथून जाताना अनेक दुचाकींचे अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी झालेले आहेत.याबाबत दैनिक पुढारीने सतत दिलेल्या वृत्ताची दखल घेत या परिसरातील समंधीत विकसक गोयल गंगा यांच्याकडून या विहिरीवर स्लॅब टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले असल्याची माहिती येथील अधिकारी व नागरिक यांनी दिली यामुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी व वाहन चालक समाधान व्यक्त करीत आहेत.


Tags : Pune, Finally, work, putting, slabs, well