Mon, Nov 19, 2018 17:26होमपेज › Pune › अखेर पुरंदरवरील कारवाईस प्रारंभ

अखेर पुरंदरवरील कारवाईस प्रारंभ

Published On: Mar 09 2018 1:58AM | Last Updated: Mar 09 2018 1:12AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यात नियमबाह्य पदव्या विविध नामांकित विद्यापीठाकडून देण्यात येत असतानाच चक्क विद्यापीठच बोगस पध्दतीने काढून नियमबाह्य पदव्यांची खैरात करणारे पुरंदर विद्यापीठ बोगस असल्याचे दैनिक ‘पुढारी’ने नोव्हेंबर महिन्यात उघडकीस आणले होते. त्यानंतर उच्च शिक्षण विभाग आणि तंत्रशिक्षण विभाग या दोन्ही विभागांनी पुरंदर विद्यापीठाची पाहणी केली. या पाहणीत हे विद्यापीठ बोगस असल्याचे सिध्द देखील झाले आहे. परंतु तब्बल चार महिने झाले तरी या विद्यापीठावर कारवाई होत नव्हती. आता या विद्यापीठावर तीन टप्प्यात कारवाई होणार असल्याची माहिती कारवाईसाठी प्राधिकृत केलेले उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ. विजय नारखेडे यांनी दिली आहे. 

पुरंदर विद्यापीठ बोगस असल्याचे उघडकीस आल्यानंतर गेल्या चार महिन्यांमध्ये केवळ कारवाईचा फार्स करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात या विद्यापीठावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर हे पाहणीसाठी आले असता त्यांना पुरंदर या बोगस विद्यापीठासंदर्भात माहिती देण्यात आली होती. त्यावर त्यांनी कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अपर सचिवांना दिले होते.