Wed, Nov 14, 2018 13:02होमपेज › Pune › अखेर पारगावला बिबट्या जेरबंद!

अखेर पारगावला बिबट्या जेरबंद!

Published On: Jul 26 2018 1:38AM | Last Updated: Jul 26 2018 1:14AMनानगाव : वार्ताहर

पारगाव सा. मा. (ता. दौंड) परिसरात गेल्या दोन वर्षांपासून दहशत निर्माण करणारा; तसेच जनावरांवर हल्ले करणारा बिबट्या अखेर जेरबंद झाला आणि पारगाव परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र अजूनही या भागात बिबटे असल्याने सर्वांचे सहकार्य मिळावे, ही अपेक्षा या वेळी नागरिकांनी व्यक्‍त केली. 

पारगाव सा.मा. (ता. दौंड) येथील ताकवणे-गोलांडे वस्ती परिसरात गेली दोन-तीन दिवसांपूर्वी वनविभागाकडून बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. मात्र त्या ठिकाणी बिबट्या फिरकत नव्हता.  बुधवारी (दि. 25) पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास पिंजरा लावलेल्या बाजूने मोठा आवाज येत होता. त्या आवाजाचा कानोसा घेत शेतकरी धनाजी ताकवणे व तान्हाजी ताकवणे यांनी पिंजर्‍याच्या बाजूला धाव घेतली.

त्यावेळी पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद झालेला दिसून आला. त्यांनी तातडीने वनविभागाला संपर्क साधून माहिती दिली. नंतर वनविभागाच्या वाहनामधुन या बिबट्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्राकडे सुरक्षित हलविण्यात आले.