Sat, Feb 23, 2019 16:54होमपेज › Pune › लघु उद्योजकांना पाचशे कोटींचा फटका

लघु उद्योजकांना पाचशे कोटींचा फटका

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 29 2018 12:30AMपिंपरी : प्रतिनिधी 

शहरातील वाहतूकदारांनी  केलेल्या संपामुळे लघु उद्योजकांना मिळणार्‍या कच्च्या मालाचा पुरवठा बंद झाला. त्याचा परिणाम उद्योजकांवर झाला आहे. अनेकांना आपले काम थांबवावे लागल्याने सुमारे पाचशे कोटींचा फटका बसला.

गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेल्या वाहतूकदारांच्या संपामुळे पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील लघु उद्योगांवर मोठा परिणाम झाला आहे. या संपामुळे लघु उद्योगांना मिळणार्‍या कच्च्या मालाचा पुरवठा थांबला. त्यामुळे अनेक लघु उद्योगातील उत्पादन थांबले आहे. संपामुळे मोठ्या कंपनीची ऑर्डर लघु उद्योगांकडून वेळेत पूर्ण होण्यास अडचणी निर्माण झाल्या. परिणामी, लघु उद्योजकांचे त्यांच्या हातातील काम जाऊन मोठे नुकसान झाले. केंद्र व राज्य सरकारने हस्तक्षेप करून हा संप वेळीच मिटविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेने केली होती. दरम्यान, हा संप मिटल्याने लघु उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.

वाहतूकदार संघटनांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी 20 जुलै पासून देशव्यापी संप पुकारला होता. उद्योगनगरी म्हणून ओळख असणार्‍या पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात लहान मोठे मिळून जवळपास 6 हजारपेक्षा जास्त लघु उद्योग कार्यरत आहेत. वाहतुकदारांच्या संपाचा मोठा फटका या उद्योगांना बसला आहे. मुंबई तसेच परराज्यातून या उद्योगांना होणारा कच्च्या मालाचा पुरवठा थांबला. त्यामुळे कारखान्यातील उत्पादनावर याचा परिणाम झाला. 

चिंचवड औद्योगिक परिसरात लहान-मोठे मिळून 6 हजारपेक्षा जास्त लघुउद्योग कार्यरत आहे. वाहतूकदारांच्या संपामुळे मुंबई; तसेच परराज्यातून येणार्‍या कच्च्या मालाचा पुरवठा बंद झाला. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. वाहतूकदारांच्या संपामुळे उद्योजकांचे किमान 400 ते 500 कोटींचे नुकसान झाले आहे; तसेच तयार उत्पादनाचा जागेअभावी साठा करण्यात अडचणी येत आहे.  - संदीप बेलसरे, अध्यक्ष पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटना.