पुणे : प्रतिनिधी
रस्त्यांवरुन धावताना बसेसना लागलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्याची कारणे शोधण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार बसेसचे फायर अॅण्ड सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बसेसचे ऑडिट करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर क्राफ्ट’ संस्थेची निवड करण्यात आली आहे. संबधित कंपनीने पिंपरी डेपोतील बसेसचे ‘फायर सेफ्टी ऑडिट’ सुरू केले असून, 50 बसेसचे ऑडिट पुर्ण केले आहे.
बाबासाहेब आजरी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सर्व बसेसचे फायर सेफ्टी ऑडिट’ करण्याचे सूचविले होते. तर, हे ऑडिट महापालिकेने करण्याची मागणी पीएमपी प्रशासनाने केली होती. त्यावर महापालिकेने फायर ऑडिट करणार्या काही संस्थांची यादी पीएमपीला दिली. एका संस्थेने पुढाकार घेत फायर ऑडिटचे प्रात्यक्षिक पीएमपी अध्यक्ष नयना गुंडे यांना दाखविले. त्यानुसार प्रायोगिक तत्वावर पिंपरी डेपोचे काम देण्यात आले.