Thu, Sep 20, 2018 10:08होमपेज › Pune › पिंपरी : दोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या

पिंपरी : दोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या

Published On: Aug 18 2018 4:08PM | Last Updated: Aug 18 2018 4:08PMपिंपरी : प्रतिनिधी

जन्मदात्या पित्यानेच आपल्या दोन लहान मुलांची हत्या करून स्व:ता गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुभम (वय - ८), रूपम (वय -१०) अशी या मुलांची नावे तर, दीपक बर्मन (वय -३५ ताथवडे) असे या पित्याचे नाव आहे. आज, शनिवार दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपक बर्मन हे आपल्या कुटुंबीयासोबत ताथवडे येथे राहतात. त्याना शुभम व रूपम ही दोन मुले आहेत. आज, शनिवार  दीपक यांची पत्नी मालती कामावर गेल्या होत्या. दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्या घरी आल्या असता त्यांना  दीपक यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. तर, दोन्ही लहान मुलांचा मृतदेह बाजूला पडल्याचे दिसले. त्यांनी त्वरित पोलिसांना  याबाबत माहिती दिली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेचा पंचनामा केला. तर, तीनही मृतदेह वायसीएम रुग्णालयात पाठवले आहेत. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.