Tue, May 21, 2019 04:47होमपेज › Pune › सदाभाऊंच्या फोटोला ६० पैशांचा भाव; संतप्त शेतकऱ्यांकडून लिलाव

सदाभाऊंच्या फोटोला ६० पैशांचा भाव; संतप्त शेतकऱ्यांकडून लिलाव

Published On: May 22 2018 7:53AM | Last Updated: May 22 2018 7:53AMपुणे : प्रतिनिधी

शेतकर्‍यांनो हमीभाव कशाला मागता, मार्केटिंग करा, असा सल्ला देणार्‍या कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विरोधात प्रहार जनक्रांती पक्ष आणि शरद जोशी विचार मंचातर्फे आंदोलन करण्यात आले. गुलटेकडी मार्केट यार्डातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर करण्यात आलेल्या आंदोलनावेळी खोत यांच्या प्रतिमेचा कांद्यासह आंदोलकांनी लिलाव केला. या लिलावात सदाभाऊंच्या प्रतिमेला साठ पैशांचा भाव मिळाला.

शेतकर्‍यांना शेतीमालाची विक्री करण्यासाठी पुणे आणि वाशी येथे कॉमन सेल हॉल उपलब्ध करून देण्याची मागणी विठ्ठल पवार यांनी केली. तर, ‘एक रुपयाची लायकी नसणार्‍या सदाभाऊंनी फुकटचे सल्ले देऊ नयेत, मंत्री होण्यापेक्षा मार्केटिंग व्यवस्थापक व्हा’, अशा शब्दात शेतकरी आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सदाभाऊ खोत यांचा निषेध करत व विविध मागण्यांसंदर्भातील निवेदन यावेळी बाजार समिती प्रशासनाकडे देण्यात आले.

आंदोलनामध्ये प्रहार जनक्रांती पक्षाचे संपर्क प्रमुख गौरव जाधव, संघटक नयन पुजारी, धनंजय भोसले, शहराध्यक्ष उमेश महाडिक, राहुल जाधव, अजिंक्य बारणे, शरद जोशी विचार मंचाचे विठ्ठल पवार, नंदा जाधव, लता गायकवाड, हिराताई पवार, पंकज खटाने, अभय पवार, संतोष नांगरे, राष्ट्रसेवा समूहाचे अमोल मानकर, प्रवीण लांडगे आदी सहभागी झाले होते.