Mon, Jun 24, 2019 16:47होमपेज › Pune › शेतकरी आंदोलन : राष्ट्रीय एकात्मता समितीचा आंदोलनाला पाठिंबा  

शेतकरी आंदोलन : राष्ट्रीय एकात्मता समितीचा आंदोलनाला पाठिंबा  

Published On: Jun 09 2018 11:31AM | Last Updated: Jun 09 2018 12:33PMपुणे : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन करत आहेत. या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने मजूर अड्यातील हुतात्मा स्मारकापासून आंदोलनास आज सकाळी अकरापासून सुरवात झाली. 

आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, प्रा. सुभाष वारे, बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश जगताप, किसान संघर्ष समिती सदस्य विठ्ठल पवार, विद्या बाळ, कामगार युनियन अध्यक्ष अमोल चव्हाण, उपाध्यक्ष गोरख मेंगडे, सचिव संतोष नांगरे, हमाल पंचायतचे गोरख बिनवडे आदी सहभागी झाले आहेत. 

या आंदोलनात माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्याबरोबरच सुराज्य सेना, लोकायत, आरोग्य सेना, मिळून सार्याजणी, सत्यशोधक कष्टकरी सभा आदी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले.