Mon, Jun 17, 2019 18:16होमपेज › Pune › बनावट आधारकार्ड बनविणार्‍यास अटक

बनावट आधारकार्ड बनविणार्‍यास अटक

Published On: Feb 25 2018 1:16AM | Last Updated: Feb 25 2018 12:24AMपुणे :  प्रतिनिधी

औंध भागातील एका किराणा दुकानात बनावट आधारकार्ड बनवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर चतुश्रृंगी पोलिसांनी उघडकीस आणला. किराणा दुकानात छापा टाकून एकाला अटक केली आहे. तर, याठिकाणा आधारकार्ड बनविण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे.

भवरलाल सेवाराम चौधरी (वय 45, रा. आंबेडकर वसाहत, औंध,मूळ-राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस नाईक सारस विठ्ठल साळवी यांनी तक्रार दिली आहे.

औंध येथील एक व्यक्ती बनावट आधारकार्ड बनवून देत असल्याची माहिती चतुःश्रुंगी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक संदेश केंजळे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार चतुःश्रुंगी पोलिसांनी बनावट व्यक्ती त्या ठिकाणी पाठवून खात्री केली. त्यानुसार औंध येथील भैरवनाथ प्रोव्हिजन स्टोअर्स या दुकानावर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी पाठविलेल्या व्यक्तीला त्यांनी जन्मतारीख खोटी असल्याचे बनावट आधारकार्ड बनवून दिल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणाहून साहित्य जप्त केले आहे. 

तसेच, त्याला आधारकार्ड बनवून देण्याचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले आहे. त्याने किती जणांस बनावट आधारकार्ड दिले आहे याचा पोलिस तपास करत आहेत.