Sun, Jul 21, 2019 10:37होमपेज › Pune › डॉलरऐवजी साबणाच्या वड्या

डॉलरऐवजी साबणाच्या वड्या

Published On: Jul 30 2018 1:31AM | Last Updated: Jul 30 2018 1:09AMपुणे : प्रतिनिधी

फॉरेन करन्सी व्यावसायिकालाच डॉलर देण्याच्या आमिषाने दीड लाख घेऊन हातात साबणाच्या वड्या अन पेपरच्या गुंडाळलेले बंडल देऊन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. विश्रांतवाडी परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी दीपक विजय गुप्ता (वय 39, रा. गणराज मंगल कार्यालय, बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल रिचार्ज तसेच फॉरेन करन्सी ट्रान्सफर करून देण्याचा व्यवसाय आहे. दरम्यान त्यांच्या दुकानावर रिचार्ज करण्यासाठी एक व्यक्ती येत होती. त्याने फिर्यादींना माझ्याकडे फॉरेन करन्सी असून ती बदलून पाहिजे असल्याचे सांगितले. त्यावेळी फिर्यादींनी त्यांना करन्सी दाखविण्यास सांगितले.

त्यानुसार, आरोपीने दुकानात आणून फॉरेन्सचीकरन्सी दाखविली. फिर्यादींनी आयडी कार्ड घेऊन यावे, लागेल, असे सांगितले. आरोपीने मावशी कुवेतवरून आली आहे. मात्र, ती आजारी असल्याने येऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना विश्रांतवाडी येथे बोलवले. करन्सी एक्सचेंज दीड लाख रुपये फिर्यादी घेऊन गेले होते. एक महिला आणि आरोपी तेथे आले. महिलेजवळ दोन पिशव्या होत्या. त्यातील एका पिशवीत असणारे डॉलर त्यांना दाखविले.

त्यानंतर महिलेने फिर्यादींकडून दीड लाख रुपये घेतले. तर, आरोपी आयडी कार्ड घेऊन येतो, असे सांगून तेथून निघून गेला. त्याचवेळी महिलेने हातचलाखी करून दुसरीच पिशवी फिर्यादीच्या हातात दिली आणि नकळत तेथून पसार झाली. काही वेळातच फिर्यादीने पिशवी पाहिला असता त्यांना पेपरचे गुंडाळलेले बंडल आणि साबणाची वडी असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास विश्रांतवाडी पोलिस करत आहेत.