Wed, Nov 14, 2018 00:09होमपेज › Pune › ‘जिओफोन’वरही आता फेसबुक

‘जिओफोन’वरही आता फेसबुक

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 12:22AMपुणे : प्रतिनिधी

फेसबुक हे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इंडिया का स्मार्टफोन ’जिओफोन’वर वापरणे शक्य होणार आहे. न्यू व्हर्जन ऑफ फेसबुक अ‍ॅप हे जिओच्या ‘केएआयओएस’ हे वेब बेस ऑपरेटींग सिस्टिमवर आधारीत आहे. जिओफोनसाठी हे विशेष एप्लिकेशन उपलब्ध या ऑपरेटींग सिस्टिमच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे फेसबुकच्या वापरकर्त्यांना उत्तम वापराचा अनुभव मिळावा हे यामागच उद्दीष्ट आहे. या फेसबुक अ‍ॅप्लिकेशनचा उपयोग हा भारतातील 50 कोटी वापरकर्त्यांना होईल.

नव्या फेसबुक अ‍ॅपच्या माध्यमातून अनेक फीचर फोन वापरकर्त्यांमधील गरजू अशा व्यक्तींना फेसबुक वापरणे शक्य होईल. या अ‍ॅपच्या माध्यमातून पुश नोटीफिकेशन, व्हिडिओ, वेब बेस ऑपरेटींग सिस्टिम यासाठी एक्सटरनल सपोर्ट मिळतो. अ‍ॅपमध्ये कर्सरचा पर्यायही आहे. त्यामुळे फेसबुकवरील न्यूजफीड आणि फोटो अशा प्रसिद्ध फीचरच्या वापरासाठी त्याचा उपयोग होईल. 

जिओफोन या परवडणार्‍या फीचरफोनच्या माध्यमातून ग्राहकांना स्मार्टफोनसारखा अनुभव देण्याचा जिओफोनचा प्रयत्न आहे. याआधीच आश्वासन दिल्याप्रमाणे जिओफोनवर आम्ही जगभरात सर्वात अग्रेसर अ‍ॅप्लिकेशन देऊ करत आहोत, त्याची सुरूवात फेसबुकच्या माध्यमातून होत आहे. भारतातल्या प्रत्येक ग्राहकाला डेटा आणि जिओ फोनच्या माध्यमातून सक्षम करण्याचा जिओ चळवळीचा उद्देश असल्याचे मत रिलायन्स जिओचे संचालक आकाश अंबानी यांनी सांगितले. 

जिओफोन वापरकर्त्या लाखो ग्राहकांना ही सेवा देण्यासाठी आम्ही उत्सुक होतो, या कराराच्या माध्यमातून आम्ही अतिशय उत्तम सेवा देणार आहोत, असे फेसबुकच्या मोबाईल पार्टनरशीपचे उपाध्यक्ष फ्रान्सिस्को वेरेला यांनी सांगितले. फेसबुकच्या आणि जिओ माध्यमातून प्रत्येकाला डेटा आणि जिओफोनवर कनेक्ट करण्यासाठी आम्ही सक्षम करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.