Tue, Jan 22, 2019 01:29होमपेज › Pune › पुणे : जिग्नेश मेवानी, उमर खालीदवर गुन्हा दाखल 

पुणे : जिग्नेश मेवानी, उमर खालीदवर गुन्हा दाखल 

Published On: Jan 04 2018 11:42AM | Last Updated: Jan 04 2018 11:42AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी आणि जेएनयूमधील विद्यार्थी उमर खालीद यांच्यावर पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात आज, सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय गौतमराव बिक्कड (वय २२, रा. कर्वेनगर पुणे, मूळ रा. बिक्कडगाव, लातूर) याच्या तक्रारीनंतर आमदार मेवानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन समाजाच्या भावना भडकवणारे भाषण करून समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप आमदार मेवानी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या भाषणामुळे भीमा कोरेगाव परिसरात अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याचा आरोप आमदार मेवानी यांच्यावर करण्यात आला आहे. जिग्नेश मेवानी आणि उमर खालीद यांच्यावर १५३ अ आणि ५०५ या कलमानुसार गुन्हा दाखल करावा, असे तक्रारीत म्हटले होते. सुरुवातीला बिक्कड यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र,  विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवार वाड्यावर एल्गार परिषद झाली होती. त्यामुळे ही तक्रार विश्रामबाग पोलिसांकडे वर्ग करण्यात आली होती. त्यानुसार आज गुन्हा दाखल करण्यात आला.