Wed, Nov 14, 2018 18:42होमपेज › Pune › कल्याणकारी योजनेच्या अर्जासाठी मुदतवाढ

कल्याणकारी योजनेच्या अर्जासाठी मुदतवाढ

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 11 2018 10:34PM

बुकमार्क करा
पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती योजना विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी अर्ज स्विकृतीची मुदत 6 वरून 20 जानेवारी 2018पर्यंत वाढविण्यात आली आहे. 

महिलांना शिवणयंत्र घेण्यासाठी अर्थसहाय, सायकल घेण्यासाठी मुलींना अर्थसहाय, सायकल घेण्यासाठी मागासवर्गीय  मुले व मुलींना अर्थसहाय, दहा वर्षे पूर्ण झालेल्या महिला बचतगटांस  अर्थसहाय,  एडसबाधितांना मोफत बसपास आणि  चार चाकी हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण या योजनासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

या योजनेच्या सन 2017-18 या आर्थिक वर्षांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी 20 जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत, अशी  माहिती उपमहापौर शैलजा मोरे यांनी बुधवारी (दि.10) दिली.  जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.